‘प्रकाशझोत’ या कथेत एक नैसर्गिक रहस्य दडलेले आहे. हे जग सनातन आहे. सनातन म्हणजे सातत्य/सल-गता असणे. हे ब्रह्मांड अणू/रेणूंनी बांधलेले आहे. याच आधारावर या जगात घडणाऱ्या कोणत्याही घटना स्वतंत्र असत नाहीत. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारणमीमांसा असतेच.
ही कारणमीमांसा म्हणजेच सलगता, प्राक्तन, कर्म असते. फुलांची आकर्षक गुंफण करून परमेश्वराला अर्पण केलेला तो एक हार असतो. तो हार परमेश्वर जोपर्यंत स्विकारत नाही तोपर्यंत घटनांची मालिका चालूच असते. जेव्हा हार स्विकारला जातो, तेव्हा त्या आत्म्याचा खऱ्या अर्थाने विजय होतो.
ही मध्यवर्ती कल्पना घेऊन या कथासंग्रहात समाविष्ट केलेल्या चार कथा आहेत. या चार कथा वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या तरीही त्या सर्व एकमेकांशी संबंधित आहेत.
पहिली कथा ‘अ.वि. स्मरणीय’ दुसरी कथा ‘प्रकाशझोत’, तिसरी कथा ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ आणि चौथी कथा ‘एक ती, एकटी आणि एक-टी’ असा एक निराळा प्रयत्न केला आहे!
या कथासंग्रहात मांडलेला विचार, प्रकाशझोत टाकून ठळकपणे समोर आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे!





