कवि रवींद्र शेणोलीकर यांचे हे दुसरे पुस्तक हायकू संग्रहाच्या रूपाने वाचकांसमोर येत आहे. या संग्रहात एकूण ३६० हायकू आहेत. हे हायकू केवळ निसर्गावर नाहीत तर ते जीवनाच्या विविध विषयांवरसुद्धा भाष्य करतात. हायकू हा वर्तमान क्षणाची जाणीव, संवेदना, दृश्य, भावना व विचार टिपणारा काव्य प्रकार आहे याचे पुरते भान ठेऊन कविने हे हायकू लिहिले आहेत हे स्पष्टपणे जाणवते. ज्या क्षणांची छाप पडून कविकडून या हायकूंची निर्मिती झाली ते क्षण वाचकांना पण तेवढ्याच तीव्रपणे भिडतील याची खात्री वाटते.
This is the second book by poet Ravindra Shenolikar to be presented to readers, taking the form of a haiku collection. The collection comprises a total of 360 haikus. These poems do not merely focus on nature; they also offer commentary on various aspects of life. It is evident that the poet has written these haikus with a keen awareness of the genre’s essence—capturing the consciousness of the present moment, along with the associated sensations, visuals, emotions, and thoughts. One can be certain that the very moments which inspired the creation of these haikus will resonate with the readers just as intensely.





