माणसाचं आयुष्य म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. जगातील प्रत्येक माणसाचे जीवन अगदी निराळे असते. भारतासारख्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात सावकारी, बागायतदार, मजुरांचे शोषण, निरक्षर समाज, सरपंच-पाटील यांची दहशत असेच चित्र होते. लेखकाच्या मनावर त्याचा परिणाम फार खोलवर झाला. त्यांनी अनुभवलेल्या जीवनात सकारात्मक व नकारात्मक प्रसंग असल्यामुळे या पुस्तकातल्या दीर्घ कथासुद्धा तशाच आहेत.
तत्कालीन परिस्थिती वाचून वाचकांना आश्चर्यच वाटेल.. त्यांचे मनोरंजन होईल. समर्पक वाक्यं, मराठी भाषेवरील प्रेम व लिखाणातील सहजता यामुळे कथांमधील पात्रांच्या चित्रणात एक रसरशीत जिवंत-पणा आढळतो. त्यांच्या कथा-लेखन प्रवासाची ही सुरुवात आनंददायी व वाचकप्रिय ठरेल असे नक्की वाटते.






Reviews
There are no reviews yet.