समाजात सभोवार अनेक समस्या निदर्शनास येतात, सारा समाज सोडून एका व्यक्तीबद्दल जरी विचार केला तरी त्या व्यक्तीमध्ये अनेक दोष, विकार आढळून येतात अशा विकारजन्य लोकांमुळे समाजही विकारजन्य होतो. नानाप्रकारचे विकार जसे क्रोध, लोभ, मत्सर, वासना, अहंकार, मद, मोह अशा अनेको विकारांचे आभाळ समाजावर कायम दाटलेले असते परंतु या आभाळाआड काहीच व्यक्ती पोहचू शकतात जे संपूर्णतः मनाला जिंकून ‘स्व’ शी परिचित होतात. तेच परमार्थ करू शकतात. जाणीवरहित परमार्थ करणारा अवलियाच समाजाचा तारणहार असतो. वासुदेव महाराजही तोच ज्ञानसूर्य आहेत, जो या विकारांच्या आभाळाआड पोहचून परमात्म्यात विलीन झाला आहे आणि आताही या ज्ञानसूर्याची ज्ञानकिरणे विकारांच्या आभाळाआड पोहचण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवत आहेत. प्रत्येकाला आपल्या विकारांचे आभाळ महाराजांच्या (ज्ञानसुर्याच्या) तेजस्वी ज्ञानकिरणांनी पूर्णपणे कोसळता येऊ शकते. आपली श्रद्धाच आपल्याला शाश्वत सत्याकडे घेऊन जाते.
आभाळा आडचा सूर्य Aabhala Aadcha Surya श्री. प्रेमनाथ विष्णू सावंत Premnath Vishnu Sawant
Original price was: ₹220.00.₹200.00Current price is: ₹200.00.