Sale!

इकडे तिकडे चोहिकडे Ikade Tikade Chohikade

Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

वसंत हळबे हे भारतीय चित्रकला आणि कॉमिक्स जगतातले एक आदरणीय नाव. त्यांच्या कलेने लाखी वाचकांच्या मनावर छाप पाडली. आवाज, उद्देली ऑल दि बेस्ट व अन्य दिवाळी अंक, रविवारची लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या हळबे यांच्या व्यंगचित्रांमध्ये सकस, निर्विष व न बोचणाऱ्या विनोदांची पखरण दिसून येते. मुलांसाठी रेखाटलेल्या त्यांच्या चित्रकथांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केले, वसंत हळबे यांचे हास्यचित्र विषयक सदर रविवारची लोकसत्ता मध्ये अनेक वर्षे ‘इकडे तिकडे चोहीकडे ह्या नावाने प्रसिध्द होत होते. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असे. म्हणूनच आम्ही ह्या संग्राह्य पुस्तकाचे नाव ‘इकडे तिकडे चोहीकडे’ असे ठेवले आहे. त्यांच्या कलेतील विविध पैलू, त्यांच्या कल्पकतेची उंची आणि त्यांच्या विनोदी लेखनाचा प्रभाव या सगळ्याचा हा एक सुंदर संग्रह आहे. ह्या पुस्तकातून त्यांच्या कलेचा सुंदर प्रवास एकत्रितपणे पहाता येईल. हळबे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यापक परिचय नव्या पिढीला होईल. त्यांच्या रेखाचित्रांची व निसर्गचित्रांची झलक, शुभेच्छापत्रांचा सुंदर संग्रह, त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे, सहकाऱ्यांचे विचार आणि त्यांच्या कलेचे वैविध्य या सगळ्याचा हा एक सुंदर अल्बम आहे.

Categories: ,

चित्रकला ही भावनांची भाषा आहे. ती शब्दांपेक्षाही प्रभावीपणे आपल्याला सांगते, दाखवते आणि हृदयाला स्पर्श करते, या भाषेत प्रवीण असलेल्या कलाकारांना आपण कधीही विसरू शकत नाही. वसंत हळबे हे भारतीय चित्रकला आणि कॉमिक्स जगतातले एक आदरणीय नाव. त्यांच्या कलेने लाखी वाचकांच्या मनावर छाप पाडली. आवाज, उद्देली ऑल दि बेस्ट व अन्य दिवाळी अंक, रविवारची लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या हळबे यांच्या व्यंगचित्रांमध्ये सकस, निर्विष व न बोचणाऱ्या विनोदांची पखरण दिसून येते. मुलांसाठी रेखाटलेल्या त्यांच्या चित्रकथांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केले, वसंत हळबे यांचे हास्यचित्र विषयक सदर रविवारची लोकसत्ता मध्ये अनेक वर्षे ‘इकडे तिकडे चोहीकडे ह्या नावाने प्रसिध्द होत होते. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असे. म्हणूनच आम्ही ह्या संग्राह्य पुस्तकाचे नाव ‘इकडे तिकडे चोहीकडे’ असे ठेवले आहे. त्यांच्या कलेतील विविध पैलू, त्यांच्या कल्पकतेची उंची आणि त्यांच्या विनोदी लेखनाचा प्रभाव या सगळ्याचा हा एक सुंदर संग्रह आहे. ह्या पुस्तकातून त्यांच्या कलेचा सुंदर प्रवास एकत्रितपणे पहाता येईल. हळबे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यापक परिचय नव्या पिढीला होईल. त्यांच्या रेखाचित्रांची व निसर्गचित्रांची झलक, शुभेच्छापत्रांचा सुंदर संग्रह, त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे, सहकाऱ्यांचे विचार आणि त्यांच्या कलेचे वैविध्य या सगळ्याचा हा एक सुंदर अल्बम आहे.

 

इकडे तिकडे चोहिकडे ( Ikade Tikade Chohikade )ह्या पुस्तकातून आपल्याला वसंत हळबे यांच्या कलेचा एक सुंदर सन्मान करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास करून आपण आपल्या कलेच्या दृष्टिकोनात नक्कीच भर घालू शकतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इकडे तिकडे चोहिकडे Ikade Tikade Chohikade”

Your email address will not be published. Required fields are marked *