हे पुस्तक मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या जगभरातील प्रवासाची एक सुंदर साक्ष आहे.
मराठी माणूस भारतापासून दूर कोठेही गेला तरीही तो आपली संस्कृती विसरत नाही. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी, केनिया, हाँगकाँग अशा अनेक देशांतील मराठी मंडळांच्या कार्याचा, त्यांच्या सांस्कृतिक उपक्रमांचा आणि त्यांच्याद्वारे होणारा मराठी संस्कृतीचा प्रसार याची माहिती या पुस्तकातून मिळते. आजच्या काळातील परदेशातील उपक्रमांचा हा एक दस्तऐवज आहे.
लेखिका मेघना साने यांनी देश विदेशातील मराठी जनांशी मैत्रीसंबंध प्रस्थापित करून परदेशातील मराठी जनांच्या प्रवासाला शब्दबद्ध केले आहे. केवळ परदेशातीलच नव्हे तर भारतातीलही गुणीजनांनी सादर केलेल्या कलाविष्कारांचे कौतुक त्यांनी स्वतःच्या अनुभवातून यात केलेले दिसते. मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्यांना हे पुस्तक निश्चितच आवडेल.









Reviews
There are no reviews yet.