गिरीश काळेंची कविता सर्वस्पर्शी असली तरी त्यांच्या कवितेला बोजडपणा कधी शिवला नाही आणि तो शिवणारही नाही. ही शब्दांची हिरवळ आहे, त्यावर बाळ रुपातली फुलपाखरं तर असणारच, ती तर भिरभिरणारच ! कवीने ह्याच शब्दांच्या हिरवळीवर एक चिमुकलं, ईश्वराच्या असीम भक्तीचं मंदिरही बांधलंय… याच शब्दांच्या हिरवळीवर भरभरून देणाऱ्या निसर्गाविषयी कृतज्ञता विसावली आहे. या हिरवळीने समाज मनाच्या गावालाही स्पर्श केलाय आणि राजकारणाच्या गढुळतेलाही ! या हिरवळीवर आशावाद ही रुजू पाहतो, फुलू पाहतो.आयुष्याची उदासवाणी सांज ही याच शब्दांच्या हिरवळीवर क्षणभर विसावते, ज्यात या आयुष्याची क्षणभंगुरता वेदनेचे रक्त होऊन ठिबकते. या हिरवळीवर एक झोपाळा आहे, त्यात मातृत्वाची अंगाई आहे. मैत्रीची रुजवात ही याच शब्दांच्या हिरवळीवर पाय पसरून निर्धास्तपणे पहुडली आहे. या हिरवळीवर अहंपणाला प्रवेश नाकारणारे एक कुंपणही कवीने घातलंय..म्हणूनच या कवितांच्या गाभाऱ्यात सहज प्रवेश करता येतो.. शब्दांच्या हिरवळीवर झुलणाऱ्या या प्रत्येक शब्दफुलाचा रंग वेगवेगळा, गंध वेगळा, आकारणं वेगळं, त्याचं साकरणंही वेगळं, त्याची जातकुळी वेगवेगळी! मनोहर वाटिकेत भ्रमंती करतांना विविधरंगी फुले वेचून आणावीत आणि त्याचा मनोवेधक गुच्छ तयार करावा, तसा मनोवेधक गुच्छ म्हणजे गिरीश काळे यांचा हा काव्यसंग्रह !
शब्दांची हिरवळ (गिरीश काळे) shabdanchi Hirval (Girish kale )
Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
गिरीश काळेंची कविता सर्वस्पर्शी असली तरी त्यांच्या कवितेला बोजडपणा कधी शिवला नाही आणि तो शिवणारही नाही. ही शब्दांची हिरवळ आहे, त्यावर बाळ रुपातली फुलपाखरं तर असणारच, ती तर भिरभिरणारच ! कवीने ह्याच शब्दांच्या हिरवळीवर एक चिमुकलं, ईश्वराच्या असीम भक्तीचं मंदिरही बांधलंय… याच शब्दांच्या हिरवळीवर भरभरून देणाऱ्या निसर्गाविषयी कृतज्ञता विसावली आहे. या हिरवळीने समाज मनाच्या गावालाही स्पर्श केलाय आणि राजकारणाच्या गढुळतेलाही ! या हिरवळीवर आशावाद ही रुजू पाहतो, फुलू पाहतो.आयुष्याची उदासवाणी सांज ही याच शब्दांच्या हिरवळीवर क्षणभर विसावते, ज्यात या आयुष्याची क्षणभंगुरता वेदनेचे रक्त होऊन ठिबकते. या हिरवळीवर एक झोपाळा आहे, त्यात मातृत्वाची अंगाई आहे. मैत्रीची रुजवात ही याच शब्दांच्या हिरवळीवर पाय पसरून निर्धास्तपणे पहुडली आहे. या हिरवळीवर अहंपणाला प्रवेश नाकारणारे एक कुंपणही कवीने घातलंय..म्हणूनच या कवितांच्या गाभाऱ्यात सहज प्रवेश करता येतो.. शब्दांच्या हिरवळीवर झुलणाऱ्या या प्रत्येक शब्दफुलाचा रंग वेगवेगळा, गंध वेगळा, आकारणं वेगळं, त्याचं साकरणंही वेगळं, त्याची जातकुळी वेगवेगळी! मनोहर वाटिकेत भ्रमंती करतांना विविधरंगी फुले वेचून आणावीत आणि त्याचा मनोवेधक गुच्छ तयार करावा, तसा मनोवेधक गुच्छ म्हणजे गिरीश काळे यांचा हा काव्यसंग्रह !

Reviews
There are no reviews yet.