राजू तुललावर असे म्हणतात की, डॉ. लक्ष्मण शिवणेकर बालनाट्य बालकांना आवडेल असं असावं. बाल प्रेक्षकांना बघायला मज्जा वाटेल आणि बाल कलाकारांना त्या नाटकात काम करायला गंमत वाटेल.. असंच असावं.
‘सशा रे सशा… तुझ्या तुपातल्या मिशा’ हे डॉ. लक्ष्मण शिवणेकर लिखित बालनाट्य, बाल आणि किशोर वयोगटातील मुलांना आवडेल असे हे नाटक आहे. बाहुलीनाट्य, परिकथा, कार्टूनकथा यांच्या सोबत ‘प्राणीनाट्य’ हा बालनाट्यातील लोकप्रिय प्रकार आहे. प्राणीनाट्य मुलांना हसवत हसवत दोन चार मोलाचे संदेश देतात सोबत चांगल्या वाईट गोष्टींचे भान देतात.
‘सशा रे सशा… तुझ्या तुपातल्या मिशा’ या नाटकातील गाणी रंगतदार आहेत. मुलांना आवडतील आणि मुलांच्या ओठावर सहज रेंगाळतील अशी गीतरचना लेखकाने केली आहे. ह्या नाटकाचा रंगमंचावरील प्रयोग दिग्दर्शकाला रंगतदार रीतीने सहज बसवता येईल. वेशभूषा, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना या सर्व तांत्रिक बाजूंना वाव देणारी नाट्यसंहिता डॉ. शिवणेकर यांनी दिलेली आहे. याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. ह्या मनोरंजक बालनाट्याचे बालरंगभूमीवर अधिकाधिक प्रयोग व्हावेत, जास्तीत जास्त बाल प्रेक्षकापर्यंत हे बालनाट्य पोहोचावे असे मला वाटते. त्यासाठी माझ्या शुभेच्छा !






Reviews
There are no reviews yet.