रोटी, कपडा, मकान या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी कला, साहित्य आणि संस्कृति या त्रयीने मनुष्याच्या जीवनात एक विरंगुळा निर्माण केला आहे. हा विरंगुळा निर्माण करण्याचे पवित्र काम अनेक दिग्गजांनी केले आहे. अशा या दिगजांचे ऋण फेडणे कठीण आहे. परंतु त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन त्यांना गौरविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी या पुस्तकात केला आहे. यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी निर्मिलेल्या या चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तसेच गायक, गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक यांच्या प्रतिभेचा तुम्हाला साक्षात्कार होईल. तसेच मराठमोळ्या संगीताला आकार देणाऱ्या भावगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत या दालनां मध्येही तुम्ही मोकळ्या मनाने भ्रमंती कराल. यामध्ये हिमालयाची उंची गाठलेले अनेक कलाकार आपल्याला अनुभवता येतील तर दुर्दैवाने प्रसिद्धीस मुकलेल्या अनेक प्रतिभावान व्यक्तिमत्वावर टाकलेला प्रकाश झोत आपले डोळे दिपवून टाकेल. मनोरंजन क्षेत्राच्या सुवर्णकाळातील अशा अनेक साक्षीदारांच्या योगदानाला आपण निश्चितच अभिवादन कराल याची खात्री आहे.
साक्षीदार सुवर्णयुगाचे Sakshidar Suvarnyugache प्रा. कृष्णकुमार गावंड Pra. Krishnakumar Gawand
Original price was: ₹400.00.₹350.00Current price is: ₹350.00.