आपण आजारी पडल्यावर आरोग्याचा विचार करतो. पण खरे दीर्घायुष्य आजार सुरू होण्याच्या खूप आधीपासून घडत असते. सक्सेस कोच विवेक मेहेत्रे ह्यांचे हे नवे पुस्तक ‘तुम्ही कधीही आजारी पडणार नाही’ असे किंवा अन्य कोणतेही अवास्तव वचन देणारे नाही. जे तुमच्या नियंत्रणात आहे, त्याचा योग्य उपयोग करून अधिक निरोगी, सक्षम आणि अर्थपूर्ण आयुष्य कसे घडवायचे हे, तुम्हाला हे पुस्तक शिकवते.
हे पुस्तक तुम्हाला ‘अमर’ बनवण्याचा प्रयत्न करत नसून ते त्याहून अधिक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर मांडते. तुम्हाला मिळणारी पुढची वर्षे तुम्ही कशी जगणार आहात ?
कारण तुम्ही किती वर्षे जगलात याऐवजी त्या वर्षांपैकी किती वर्षे तुम्ही सक्षम, स्वतंत्र, सक्रिय आणि आनंदीपणे जगलात हे महत्त्वाचे असते.
या पुस्तकात तुम्हाला समजेल
* चालणे पुरेसे का नाही? फिटनेसचे महत्त्व
* झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही
* मन आणि शरीराचे नाते
* तणावाचे व्यवस्थापन
* डाएट आणि सुपरफूडच्या भ्रमामागचे वास्तव
* तुमचे मेडिकल अहवाल काय सांगतात ?.. आणि इतर महत्त्वाचे संकेत
* तुमचे घर, तुमच्या सवयी यांचा आरोग्यावर परिणाम
* नातेसंबंध आणि तुमचे जगण्याचे प्रयोजनः दीर्घायुष्याला अर्थ देणारे दोन दुर्लक्षित घटक
* स्वतःच्या आरोग्याकडे प्रामाणिकपणे पाहण्याची पद्धत
* वाचलेले ज्ञान रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी कृतीशील मार्गदर्शक
We usually think about our health only after falling ill. However, true longevity is cultivated long before illness sets in. This new book by success coach Vivek Mehetre does not make unrealistic promises—such as claiming you will never fall ill. Instead, it teaches you how to build a healthier, more capable, and meaningful life by effectively utilizing the factors within your control.
Rather than attempting to make you ‘immortal,’ this book addresses a far more important question: How will you live the years ahead of you?
After all, what truly matters is not just the total number of years you live, but how many of those years are spent living capably, independently, actively, and happily.
In this book, you will learn about:
* Why walking alone isn’t enough: The importance of fitness
* Sleep: It is more than just rest
* The mind-body connection
* Stress management
* The reality behind the myths of diets and ‘superfoods’
* What your medical reports reveal… and other key health indicators
* The impact of your home environment and habits on your health
* Relationships and your life’s purpose: Two often-overlooked factors that give meaning to longevity
* A way to honestly assess your own health
* An actionable guide to applying what you learn to your daily life





