ग्रहांचे बळ, महापुरुषयोग, कर्तरीयोग, राजयोग, अन्योन्ययोग, कारकांचे नियम, राहु-केतूची फळे, चंद्रकुंडली, अस्तंगत ग्रह इ. संकल्पना भारतीय ज्योतिषशाखाचे वैशिष्ट्य आहेत. ग्रहस्थितीचा अर्थ नीट लावता येण्यासाठी या संकल्पना यथार्थपणे उलगडलेल्या असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय नक्षत्रे, नवमांश, ग्रहयोग अशा गोष्टी फलितासाठी स्किलफुली वापरता येत नाहीत. पण सर्वात जास्त गैरसमजही याच संकल्पनांबद्दल आढळतात.
मूळ नियम, प्रचलित समज-गैरसमज, त्या नियमांमागील मर्म, माझे विश्लेषण व अनुभूती या सर्व बाजूंनी खंड ४ व ५ मध्ये फलितासाठी महत्वाच्या नियमांचा, संकल्पनांचा अत्यंत विस्तृतपणे उलगडा केला आहे. त्याने तुमच्या अनेक शंकांचे निरसन होईल व विचारांमध्ये स्पष्टता येईल. ज्योतिष नियमांचा उलगडा होण्यासाठी कळकळीच्या अभ्यासकाला या खंडांची फार मदत होणार आहे.





