Ashi mi Ashi mi !
₹160.00
. वर्तमानकाळात राहून भूतकाळाचा शोध घेण्याचा तारा रावत यांचा हा प्रयत्न. त्यांच्या जीवनात मिळालेले वळण, घडलेल्या घटना, भेटलेल्या व्यक्ती, त्यांचा स्वजीवनावर झालेला प्रभाव आणि परिणाम यांचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयत्न ठरतो. जीवनातील हर्षामर्षाचे क्षण आणि सुख दु:खाच्या झुल्यावरील आंदोलने यांचा ताळमेळ घालण्याचा हा प्रयत्न ठरतो. ‘मी’ ने संघर्षाला, ताणतणावाला, बेवफाईला कसे तोंड दिले यांचा सैलसा, झिरमिळता स्मृतिपटल ‘अशी मी अशी मी’ मधून व्यक्त होतो. दारिद्र्य, अनाथपणा, जीवनातील अस्थिरता त्यांच्या वाटचालीत आली पण त्या व्यथित झाल्या नाहीत तर धैर्याने त्या त्या प्रसंगांना सामोऱ्या गेल्या आणि संकटांवर कशी मात करावी याचे उदाहरणच जणू त्यांनी वाचकांसमोर दृढपणे मांडले आहे. निर्मळ मन, पारदर्शक विचार आणि आशावादी दृष्टिकोन हा या चिंतनाचा गाभा आहे. ‘स्व’ पासून तटस्थ होत आणि ‘स्व’ मध्ये विरघळून जात त्यांनी आपलेच रूप आपल्याच आत्मदर्पणात शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.





Reviews
There are no reviews yet.