मुले ही देशाची संपत्ती आहे, तिचे योग्य संगोपन केले पाहिजे अशी भूमिका प्रत्येक मुलांच्या बाबतीत असली पाहिजे. समतोल फाऊंडेशनच्या सेवाकार्यात १७/१८ वर्षे झाली, प्रत्येक मुलाला भेटल्यावर त्यांची माहिती घेत असतो तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. त्यातून एक गोष्ट नक्की समजते की, मुलांची बौद्धिक क्षमता तशी फार सक्षम असते. तसेच त्यांचे निरिक्षणसुद्धा चांगले असते. प्रत्येक गोष्टींचा ते सामना करतात व उघड्या समाजात राहतात.या मुलांची शारीरिक क्षमताही चांगली असते, हीच एनर्जी (उर्जा) चांगल्या दिशेने जावी यासाठी समतोल फाऊंडेशन प्रयत्न करीत आहे. प्रत्येक मुलाला घर असतेच, फक्त त्याला सुरक्षित वातावरण असायला हवे. अनेक मुले शहराच्या आकर्षणाने, घरातील कौटुंबिक समस्येमुळे घरापासून दूर होतात. घरात मुलांना काळजी व संरक्षणाची गरज असते. जर ती मिळाली नाही तर हीच मुले गुन्हेगारीकडे जाऊ शकतात व समाजाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून या मुलांची मनपरिवर्तन झाले पाहिजे.आपण सर्व हे पुस्तक वाचाल तर मुलांशी कसे वागायचे हे आपोआपच शिकाल. सर्वांनी समतोल फाउंडेशनच्या कार्यात सहभागी व्हावे. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते भविष्यातील देशाचे नागरिकसुद्धा आहेत. त्यामुळे ते सुरक्षित असणे महत्त्वाचे व गरजेचे आहे. लैंगिक शोषण, अत्याचार, बालकामगार, बालविवाह हे जर व्हायचे नसेल तर आपला समाज हा बालप्रेमी समाज असला पाहिजे असावा असे आम्हाला वाटते.
Haravalel Mukkam Post हरवलेलं मुक्काम पोस्ट
Original price was: ₹350.00.₹345.00Current price is: ₹345.00.