बाल कवितांजली हा कवितासंग्रह सहा ते बारा वयोगटातील मुलांच्या भावविश्वाशी अधिक जवळचा असला तरी सर्वच वयोगटातील वाचकांसाठी तितकाच समर्पक, रंजक आणि अंतर्मुख करणारा आहे… हे मात्र खरे. सृष्टीतील घटनांचे निरीक्षण करून बालकांच्या मनात जे प्रश्न सहज निर्माण होतात ते या संग्रहातील कवितांमधून उपस्थित केले आहेत. कविता वाचून प्रश्नांची उत्तरे मुले मोबाईलच्या मदतीने शोधू शकतात. तसेच आई-वडील, मित्र, नातेवाईक आणि शाळेत गुरुजींना विचारू शकतात. यातून त्यांचा बौद्धिक विकास तर होईलच त्याचबरोबर सामाजिक विकास व्हायला मदत होईल. हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून यातील कवितांची रचना करण्यात आली आहे.
यातील काही प्रश्नांची उत्तरे सहज मिळणार नाहीत याचाही अनुभव मुले घेऊ शकतील. यातून मुलांची जिज्ञासा जागृत होईल. असे झाल्यास मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून या क्षमतेचे संवर्धन होईल… असा विश्वास वाटतो.





