श्रद्धेय अटलजी हे भारतीय राजकारणातील एक अद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते. संघटन कौशल्य, वक्तृत्व, कणखर निर्णयक्षमता आणि विचारसंपन्न नेतृत्व या चार गुणांच्या जोरावर त्यांनी भारताचे भविष्य घडविले.
‘सरकारे येतील-जातील, पण देश सर्वोच्च असावा’ हा त्यांचा दृढ विश्वास कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शन करणारा ठरणार आहे.लेखक डॉ. शिवणेकर यांनी अटलजींच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकत तरुण पिढीसमोर एक आदर्श मांडला आहे, ही अतिशय मोलाची गोष्ट आहे. अजातशत्रू अटलजींच्या जन्म शताब्दीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित होणारा हा ग्रंथ त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची ओळख नवीन पिढीपर्यंत पोहोचवेल, अशी खात्री वाटते.





